Ad will apear here
Next
देशातील पहिली एअरट्रेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर होणार
अंतर्गत प्रवासासाठी विशेष सुविधा
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतर्गत प्रवासासाठी लवकरच ‘एअरट्रेन’ सुरू केली जाणार आहे. एअरट्रेन म्हणजे खास विमानतळासाठी असलेली मेट्रो रेल्वेची सुविधा. अशी सुविधा असणारा हा देशातील पहिला विमानतळ ठरणार आहे. 


लंडनचा हिथ्रो विमानतळ, न्यूयॉर्कचा जॉन. एफ. केनेडी विमानतळ, तसेच झुरीच, हाँगकाँग अशा आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या टर्मिनल्सवरून थेट मेट्रो स्टेशन्सपर्यंत जाण्याकरिता रेल्वे सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर उतरल्यावर इच्छित स्थळी जाण्याकरिता रेल्वेनेच थेट मेट्रो स्टेशनवर जाता येते. याच धर्तीवर दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही मेट्रो ट्रेनची सुविधा साकारण्यात येत आहे. 


या एअरट्रेन प्रकल्पासाठी २५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने (डीआयएएल) निधी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. टी वन, टी टू, टी थ्री हे टर्मिनल्स या ‘एअरट्रेन’द्वारे जोडले जाणार असून, विमानतळानजीकचे एरोसिटी हे हॉटेल संकुलही याद्वारे जोडले जाणार आहे. सध्या विमानतळावरून ‘टर्मिनल थ्री’वर सहज जाता येते, तर टर्मिनल वन आणि टूवर जाण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. हा बसप्रवास एअरट्रेनमुळे थांबणार असून, प्रवाशांना सहजपणे विमानतळाबाहेर पडणे किंवा वेगळ्या टर्मिनलवर जाणे शक्य होणार आहे. एका विमानाने येऊन पुढच्या प्रवासाठी दुसऱ्या टर्मिनलवरील विमान पकडायचे असल्यास, अशा तिकीट असलेल्या प्रवाशांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. दर वीस मिनिटांनी ही ट्रेन धावणार आहे. 


एअरट्रेन प्रकल्प २०१६मध्ये मांडण्यात आला होता. तो २०२०पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र अद्याप त्याचे बांधकाम सुरू झालेले नाही. त्यामुळे २०२०मध्ये तो पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे; तरीही आता या प्रकल्पाला गती मिळाल्याने लवकरच तो पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZHQBZ
Similar Posts
दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण होणार नवी दिल्ली : देशातील दहा सरकारी बँकांचे चार बँकांमध्ये विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (३० ऑगस्ट २०१९) नवी दिल्लीत केली. त्यामुळे सरकारी बँकांची संख्या २७वरून १२ होणार आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचाऱ्यांची कोणतीही कपात केली जाणार नाही, असेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले
नेपाळशी मैत्रीला कराराचे ‘इंधन’ नवी दिल्ली : भारताने नेपाळला दर वर्षी १३ लाख टन इंधनाचा पुरवठा करण्याचा करार केला आहे. या करारानुसार इंडियन ऑइल ही सरकारी कंपनी पुढील पाच वर्षे नेपाळला पेट्रोल, डिझेल, घरगुती वापराचा नैसर्गिक वायू, केरोसीन, हवाई इंधन यांचा पुरवठा करणार आहे.  भौगोलिकदृष्ट्या भारत आणि चीनच्या मध्यभागी असणाऱ्या
सौदी अरेबियाची गुंतवणूक वाढावी यासाठी ‘इंडिया इन्व्हेस्ट ग्रिड’ची स्थापना नवी दिल्ली : सौदी अरेबियाची भारतातील गुंतवणूक वाढवण्यासाठी ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची स्थापना करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या नीती आयोगाच्या शिष्टमंडळाच्या भेटीत ‘इन्व्हेस्ट इंडिया ग्रिड’ची घोषणा करण्यात आली.
भारताची निर्यात ३३१ अब्ज डॉलरवर; वाढीचा नवा विक्रम नवी दिल्ली : २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या निर्यातीत विक्रमी वाढ नोंदवली गेली असून, तब्बल ३३१ अब्ज डॉलरची एवढ्या मूल्याची निर्यात भारतातून झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत निर्यातीत नऊ टक्के वाढ झाली आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये नोंदवण्यात आलेला निर्यातीचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language